Corona Update | देशातील 10 राज्यांत झपाट्याने कोरोना रुग्णवाढ ; केंद्र सरकारच्या राज्यांना सूचना
देशातील 10 राज्यांत झपाट्याने कोरोना रुग्णवाढ झाल्याची पाहायला मिळत आहे. 10 हॉटस्पॉटमध्ये महाराष्ट्राचाही समावेश आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने राज्य सरकारला सूचना दिल्या आहेत. ज्या ठिकाणचा संसर्गदर 10 % पेक्षा जास्त असल्यास कडक निर्बंध लावण्याचे आदेश केंद्राने दिले आहेत.
देशातील 10 राज्यांत झपाट्याने कोरोना रुग्णवाढ झाल्याची पाहायला मिळत आहे. 10 हॉटस्पॉटमध्ये महाराष्ट्राचाही समावेश आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने राज्य सरकारला सूचना दिल्या आहेत. ज्या ठिकाणचा संसर्गदर 10 % पेक्षा जास्त असल्यास कडक निर्बंध लावण्याचे आदेश केंद्राने दिले आहेत. केंद्राने महाराष्ट्रासह 10 राज्यांना सावध केलं आहे. देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ झाली. कालच्या दिवसात 44 हजार 230 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर अॅक्टिव्ह केसेसही पुन्हा चार लाखांच्या वर गेल्या आहेत. कालच्या दिवसात 555 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले.
Latest Videos