Special Report | ध्वजारोहणावेळी रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरेंनी आचारसंहिता भंग केल्याचा आरोप; तक्रार दाखल

Special Report | ध्वजारोहणावेळी रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरेंनी आचारसंहिता भंग केल्याचा आरोप; तक्रार दाखल

| Updated on: Jan 27, 2022 | 9:58 PM

प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि सुपुत्र मंत्री आदित्य ठाकरे यांनी आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. अ‍ॅड जयश्री पाटील यांनी आरोप केला आहे. जयश्री पाटील यांनी केवळ आरोपच केला नाही तर याविरोधात पोलिसांत तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे.

मुंबई : प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) आणि सुपुत्र मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. अ‍ॅड जयश्री पाटील (Jayshree patil) यांनी आरोप केला आहे. जयश्री पाटील यांनी केवळ आरोपच केला नाही तर याविरोधात पोलिसांत तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे. ध्वजारोहणाच्या वेळी रश्मी ठाकरे यांनी राष्ट्रध्वजाला सॅल्यूट केला नाही, तसेच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना नियमबाह्य पद्धतीनं रेड कार्पेटवर बोलविण्यात आल्याचा आरोप जयश्री पाटील यांनी आपल्या तक्रारीमध्ये केला आहे. या प्रकरणी लोकायुक्तांकडे देखील तक्रार दाखल करण्यात आली आहे.