Abdul Sattar | रश्मी ठाकरे पडद्यामागून राजकारणाची सूत्र सांभाळतात : अब्दुल सत्तार

Abdul Sattar | रश्मी ठाकरे पडद्यामागून राजकारणाची सूत्र सांभाळतात : अब्दुल सत्तार

| Updated on: Jan 04, 2022 | 4:54 PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पाठीच्या मणक्यावर नुकतीच एक शस्त्रक्रिया पार पडली आहे. त्यानंतर ते महत्वाच्या बैठका, हिवाळी अधिवेशनात अनुपस्थित राहिले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पाठीच्या मणक्यावर नुकतीच एक शस्त्रक्रिया पार पडली आहे. त्यानंतर ते महत्वाच्या बैठका, हिवाळी अधिवेशनात अनुपस्थित राहिले. 1 जानेवारी रोजी नगरविकास खात्याच्या एका बैठकीनंतर ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे जनतेसमोर आले. मात्र, या काळात विरोधकांकडून त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली. उद्धव ठाकरे यांना अन्य कुणावर विश्वास नसेल तर मुख्यमंत्रीपदाचा कारभार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) किंवा रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांच्याकडे देण्याचा सल्लाही भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला होता. त्यानंतर आता शिवसेनेच्याच एका नेत्यानं याबाबत केलेल्या वक्तव्यानं पुन्हा एकदा चर्चेला तोंड फुटलं आहे.

शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी रश्मी ठाकरे या उत्तमप्रकारे मुख्यमंत्रीपद सांभाळू शकतात असं वक्तव्य केलं आहे. सत्तार म्हणाले की, ‘रश्मी ताईची काम करण्याची पद्धत एक अभ्यासू महिला म्हणून त्यांचं जे नियोजन असते. आज त्या पदड्याच्या मागे काम करत असतात. त्या पडद्याच्या पुढे नाहीत. पण त्यांना महाराष्ट्रातील राजकारण बऱ्यापैकी माहिती असतं. कारण त्या साहेबांच्या सोबत राहतात. आदित्य साहेब कसे काम करतात, मोठे साहेब कसं काम करतात, या सर्वांच्या पेक्षा एक महिला म्हणून त्यांचं नियोजन कसं असतं, कशा पद्धतीने महिला सक्षम व्हायला पाहिजेत, त्यांचं बळकटीकरण कसं व्हायला पाहिजे, महिलांना फक्त चूल आणि मुल न करता, त्यांना सक्षम कसं करायला पाहिजे यासाठी ताईसाहेबांचं काम मोठं आहे. उद्धव साहेबांचा आदेश असेल तर मला वाटतं काहीही होऊ शकतं. मला वाटतं त्यांच्यावर जबाबदारी देऊही शकतात. आता त्या सामनाच्या मुख्य संपादक म्हणूनही उत्तम काम करत आहेत. लोकशाहीच्या मार्गाने लोकांपर्यंत कसं पोहोचलं पाहिजे. त्यांना न्याय देण्यासाठी कशा उपाययोजना करायला पाहिजे. राज्यात एक आदर्श महिला म्हणून त्यांचं नाव आहे, असं मत सत्तार यांनी मांडलं आहे.

Published on: Jan 04, 2022 04:48 PM