अयोध्येतील राम मंदिर लोकार्पणाचा मुहूर्त ठरणार? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बैठकीत कोणता मुद्दा केंद्रस्थानी?

अयोध्येतील राम मंदिर लोकार्पणाचा मुहूर्त ठरणार? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बैठकीत कोणता मुद्दा केंद्रस्थानी?

| Updated on: Sep 13, 2023 | 10:47 AM

VIDEO | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बैठकीत राम मंदिर लोकार्पणाचा मुहूर्त ठरणार, पुण्यात शनिवारपर्यंत RSS ची बैठक, सर संघचालक मोहन भागवत तसेच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हे उपस्थित राहणार

पुणे, १३ सप्टेंबर २०२३ | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय समन्वय समितीची बैठक उद्यापासून २ दिवस पुण्यात पार पडणार आहे. या बैठकीची तयारी पूर्ण झालेली असून बैठकीला संघ परिवारातील ३६ संघटनांचे २६६ पदाधिकारी उपस्थितीत राहतील. या बैठकीला सर संघचालक मोहन भागवत तसेच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हे उपस्थित राहणार आहेत. या बैठकीमध्ये अयोध्येतील राम मंदिरांचा मुद्दा बैठकीच्या केंद्रस्थानी असणार आहे. तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बैठकीत राम मंदिर लोकार्पणाचा मुहूर्त ठरणार असल्याचे सांगितले जात आहे. राम मंदिर लोकार्पणाच्या कार्यक्रमाची रूपरेषा देखील ठरविली जाणार आहे. इतकंच नाही तर अयोध्येतील राम मंदिराच्या लोकार्पणावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देशभरात आनंदोत्सव साजरा करणार आहे.

Published on: Sep 13, 2023 10:47 AM