Mohan Bhagwat : आगामी निवडणुकांमध्ये माथी भडकवली जातील, पण लक्षात...; मोहन भागवत यांच्या वक्तव्यानं जोरदार चर्चा

Mohan Bhagwat : आगामी निवडणुकांमध्ये माथी भडकवली जातील, पण लक्षात…; मोहन भागवत यांच्या वक्तव्यानं जोरदार चर्चा

| Updated on: Oct 24, 2023 | 3:48 PM

VIDEO | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आगामी निवडणुकांसदर्भात सूचक वक्तव्य केले आहे. या वक्तव्यांची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. 'शांत डोक्याने विचार करा की, कुणी चांगलं काम केले आहे. जो चांगला त्याला मतदान करा', असे भागवत म्हणाले.

नागपूर, २४ ऑक्टोबर २०२३ | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आगामी निवडणुकांसदर्भात सूचक वक्तव्य केले आहे. आगामी निवडणुकांमध्ये लोकांची माथी भडकवण्याचे काम होईल, असे मोहन भागवत यांनी म्हटले आहे. येत्या निवडणुकांबाबत केलेल्या मोहन भागवत यांच्या या सूचक वक्तव्याची राजकीय वर्तुळात एकच चर्चा होत आहे. मोहन भागवत म्हणाले, ‘येणार दिवस हे निवडणुकांचे आहेत. आता लोकसभा निवडणूक आहे. काही दिवसात राज्यांच्या निवडणुका आहेत. मतदान करणं हे प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. पण लहान गोष्टींच्या अधारे मतदान करायचं नाही. शांत डोक्याने विचार करा की, कोण चांगलं आहे. कुणी चांगलं काम केले आहे. भारताच्या जनतेकडे या सर्वांचा अनुभव आहे. त्यामुळे यापैकी जो कोणी सर्वात चांगला त्याला मतदान करा.’ असे मोहन भागवत यांनी म्हटले आहे.

Published on: Oct 24, 2023 03:48 PM