VIDEO : Lonavla मध्ये जुन्या Pune - Mumbai महामार्गावर रास्ता रोको, वाढत्या अपघातांमुळे नागरिक आक्रमक

VIDEO : Lonavla मध्ये जुन्या Pune – Mumbai महामार्गावर रास्ता रोको, वाढत्या अपघातांमुळे नागरिक आक्रमक

| Updated on: Feb 20, 2022 | 12:37 PM

लोणावळाकरांनी जुना पुणे-मुंबई महामार्ग रोखून धरला आहे. वाढते अपघात शहर वासीयांच्या जीवावर उठू लागल्याने नागरिक आक्रमक झाले आहेत. रविवारी मोठ्या संख्येने पर्यटक पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी येत असतात अन तीच वेळ रास्ता रोकोसाठी निवडण्यात आलेली आहे. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक सध्या ठप्प झाली आहे.

लोणावळाकरांनी जुना पुणे-मुंबई महामार्ग रोखून धरला आहे. वाढते अपघात शहर वासीयांच्या जीवावर उठू लागल्याने नागरिक आक्रमक झाले आहेत. रविवारी मोठ्या संख्येने पर्यटक पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी येत असतात अन तीच वेळ रास्ता रोकोसाठी निवडण्यात आलेली आहे. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक सध्या ठप्प झाली आहे. पर्यायी मार्ग आता खुले केले जातायेत. एमएसआरडीसी आणि आयआरबी कंपनी विरोधात हे आंदोलन छेडण्यात आलंय. शहरातून जाणाऱ्या मार्गाचे रुंदीकरण करावे, अशी वारंवार मागणी करण्यात येत आहे. परंतु एमएसआरडीसी आणि आयआरबी कंपनी त्याला गांभीर्याने घेत नाहीये. म्हणूनच आज आक्रमक पवित्रा घेत नागरिकांनी घेतला आहे.