संरक्षणाच्या दृष्टीने रत्नागिरी विमानतळाला महत्वः उदय सामंत
रत्नागिरी विमानतळाची पाहणी करताना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी विमानतळाची माहिती आणि ते कधीपर्यंत सुरू होऊन रत्नागिरीकरांचे स्वप्न एक ते दीड वर्षात पूर्ण होईल असे सांगितले. होणारे विमानतळ हे सुसज्ज असून याठिकाणी नाईट लॅडिंगचीही सोय असणार आहे. त्यामुळे देशाच्या संरक्षणासाठीही याचा उपयोग होणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी विमानतळाची (Airport) पाहणी केली यावेळी त्यांनी विमानतळाबाबत असलेले गैरसमज, लांबी रुंदी किती वाढवली आहे. नागरिकांना असणाऱ्या या शंका होत्या यासाठी विमानतळाची माहिती घेतली असल्याचे सांगितल. देशाच्या संरक्षणच्या (Defense) दृष्टीनेही रत्नागिरी विमानतळाले महत्व आले आहे. विमानतळाच्या एअर स्ट्रीपचे काम पूर्ण झाले आहे. त्याची रुंदी 65 मीटरची असून नाईट लॅडिंगही येथे होणार आहेत. विमानतळाची काही तांत्रिक कामं अजून शिल्लक असून त्यासाठी एक ते दीड वर्षे अजून लागणार आहेत.
Published on: Jan 30, 2022 08:21 PM
Latest Videos