रत्नागिरीत ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत
निवडणुकीत आणि निवडणुकीनंतर वरिष्ठ लोकांनी दखल न घेतल्याची भावना माजी आमदार राजन साळवी यांनी व्यक्त केली. इतकंच नाहीतर येत्या महिन्याभरात राजन साळवी मोठा निर्णय घेणार असल्याचीही माहिती सूत्रांकडून मिळतेय
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासंदर्भात एक मोठी बातमी समोर येत आहे. रत्नागिरीत ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण माजी आमदार राजन साळवी पक्षाला रामराम करण्याच्या तयारी असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. निवडणुकीत आणि निवडणुकीनंतर वरिष्ठ लोकांनी दखल न घेतल्याची भावना माजी आमदार राजन साळवी यांनी व्यक्त केली. इतकंच नाहीतर येत्या महिन्याभरात राजन साळवी मोठा निर्णय घेणार असल्याचीही माहिती सूत्रांकडून मिळतेय. दरम्यान, राजन साळवी हे ठाकरे गटाला रामराम करून भाजपमध्ये जाणार असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. राजन साळवी यांच्यामागे एसीबीचा सरेमिरा लागला होता. तो पुन्हा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळेच राजन साळवी आता भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चांना उधाण आले आहे. मात्र अद्याप यासंदर्भात माजी आमदार राजन साळवी यांच्याकडून कोणताही दुजोरा मिळालेला नाही. याच चर्चा दरम्यान, राज साळवी यांच्याशी टीव्ही ९ मराठीने संपर्क साधला असता या बातम्यांमध्ये तथ्य नसल्याचे राजन साळवी म्हणाले तर योग्य वेळ आल्यावर बोलेन असंही त्यांनी म्हटलंय.