मंत्री उदय सामंतांचे भाऊ किरण सामंत विधानसभा लढवणार, 'या' मतदारसंघाचं करणार नेतृत्व

मंत्री उदय सामंतांचे भाऊ किरण सामंत विधानसभा लढवणार, ‘या’ मतदारसंघाचं करणार नेतृत्व

| Updated on: May 02, 2024 | 2:10 PM

लांजा इथे शेकडो कार्यकर्त्यांनी किरण सामंत यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला आहे. सध्या किरण सामंत महायुतीच्या प्रचारात व्यस्त असून रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात नारायण राणे यांना विजयी करण्यासाठी किरण सामंत यांचा पुन्हा रत्नागिरीत जोरदार प्रचार सुरू

शिवसेनेचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे विधानसभा निवडणूक लढवणार आहे. रत्नागिरीतील लांजा-राजापूर विधानसभा मतदारसंघाचं किरण सामंत हे नेतृत्व करणार आहेत. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राहुल पंडित यांनी या संदर्भातील मोठी आणि महत्त्वाची माहिती दिली आहे. ‘लांजाकरवासियांच्या दृष्टीने आनंदाची बातमी म्हणजे किरण सामंत हे लांजा-राजापूर विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी घेणार आहे. त्यामुळे शिवसेनेची ताकद आणखी वाढली आहे.’, असे राहुल पंडित यांनी सांगितले आहे. तर नुकत्याच झालेल्या राजकीय धक्क्यानंतर किरण सामंत हे पुन्हा एकदा प्रचारात सक्रिय झाल्याची माहिती मिळतेय. यादरम्यान, लांजा इथे शेकडो कार्यकर्त्यांनी किरण सामंत यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला आहे. सध्या किरण सामंत महायुतीच्या प्रचारात व्यस्त असून रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात नारायण राणे यांना विजयी करण्यासाठी किरण सामंत यांनी आपला जोरदार प्रचार सुरू केला आहे.

Published on: May 02, 2024 02:10 PM