Ratnagiri Rain | रत्नागिरीमध्ये रात्रभर मुसळधार, राजापुरातील अर्जुना नदी इशारा पातळीच्या बाहेर

Ratnagiri Rain | रत्नागिरीमध्ये रात्रभर मुसळधार, राजापुरातील अर्जुना नदी इशारा पातळीच्या बाहेर

| Updated on: Jun 17, 2021 | 10:38 AM

जिल्ह्यात मध्यरात्रीपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. दक्षिण रत्नागिरी आणि उत्तरेकडे पावसाचा जोर अधिक पाहायला मिळतोय. रात्रभर रत्नागिरी, संगमेश्वर, लांजा, राजापूर, चिपळूण गुहागर या भागात पावसाचा जोर पाहायला मिळाला. | Ratnagiri Rain Update Heavy Rain

जिल्ह्यात मध्यरात्रीपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. दक्षिण रत्नागिरी आणि उत्तरेकडे पावसाचा जोर अधिक पाहायला मिळतोय. रात्रभर रत्नागिरी, संगमेश्वर, लांजा, राजापूर, चिपळूण गुहागर या भागात पावसाचा जोर पाहायला मिळाला. राजापूर तालुक्यात देखील मुसळधार पाऊस होतोय. त्यामुळे अर्जुना नदीला पूर आलाय. राजापूर शहरांमधल्या जवाहर चौकात सध्या पाणी आलंय. राजापूर बाजारपेठेमध्ये पुराचं पाणी येण्याची शक्यता आहे. त्यामुळेव्यापाऱ्यांनी काळजी घेण्यास सुरुवात केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पहाटे नंतर पावसाचा जोर ओसरला पाहायला मिळतोय. | Ratnagiri Rain Update Heavy Rain Rajapur Arjuna River Water Level Increases