इथं लोक कडाक्याच्या उन्हानं हैराण अन् भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या? कुठे घडला प्रकार?
इथं लोक कडाक्याच्या उन्हानं हैराण होत असताना भर उन्हाळ्यात पाण्यात गाड्या बुडाल्याने एकच धावपळ उडाली. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर शहरातील कोदवली नदीत आज अचानक भरतीचे पाणी आल्याचे पाहायला मिळाले. नेमकं काय घडलं?
सध्या देशभरासह राज्यात प्रचंड उन्हाचं तापमान दिसंतय. या कडाक्याच्या तापमानानं राज्यात काही जिल्ह्यात उष्माघाताने काहींचा बळी गेल्याच्याही घटना घडल्यात. इथं लोक कडाक्याच्या उन्हानं हैराण होत असताना भर उन्हाळ्यात पाण्यात गाड्या बुडाल्याने एकच धावपळ उडाली. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर शहरातील कोदवली नदीत आज अचानक भरतीचे पाणी आल्याचे पाहायला मिळाले. भरतीचे पाणी अचानक आल्यानं नदी पात्रातील गाड्या पाण्यात अडकल्याचे पाहायला मिळाले. यामध्ये रिक्षा आणि चार चाकी गाड्या जशा पुराच्या पाण्यात बुडतात तशा बुडल्या होत्या. यामुळे गाड्या मालकांचं मोठं नुकसान झाले. या प्रकारानंतर पाण्यात अडकलेल्या गाड्या काढण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले. मात्र भर उन्हाळ्यात अचानक रस्त्यावर पाणी कुठून आलं हे नागरिकांना कळेना… त्यामुळे नागरिकांची एकच धांदल उडाली. तर कोदवली आणि अर्जुना नदी मधील गाळ काढण्याचा परिणाम असल्याची चर्चा या गावात सुरू झाली.