जागावाटपावरून महायुतीत वादाची ठिणगी; रामदास कदम संतापले अन् म्हणाले, 'सर्व पक्षांना संपवून भाजपला फक्त...'

जागावाटपावरून महायुतीत वादाची ठिणगी; रामदास कदम संतापले अन् म्हणाले, ‘सर्व पक्षांना संपवून भाजपला फक्त…’

| Updated on: Mar 03, 2024 | 11:32 AM

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघावर आपला दावा सांगितल्यानंतर रामदास कदमांनी थेट भाजपवरच हल्लाबोल केलाय. रामदास कदमांनी मित्रपक्षावर केलेल्या टीकेनंतर विरोधकांना महायुतीला डिवचण्याची आयती संधी मिळाली.

मुंबई, ३ मार्च २०२४ : लोकसभेच्या जागावाटपावरून शिंदे गटाचे नेते रामदास कदम चांगलेच संतापलेत. रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या जागेवरून त्यांनी भाजपवर निशाणा साधलाय. सर्व पक्षांना संपवून भाजपला एकट्याला जीवंत राहायचंय का? असा सवाल उपस्थित करून रामदास कदम यांनी टिकास्त्र डागलंय. शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी पुन्हा एकदा आपल्या मित्रपक्षांवर निशाणा साधल्याचे पाहायला मिळाले. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघावर आपला दावा सांगितल्यानंतर रामदास कदमांनी थेट भाजपवरच हल्लाबोल केलाय. रामदास कदमांनी मित्रपक्षावर केलेल्या टीकेनंतर विरोधकांना महायुतीला डिवचण्याची आयती संधी मिळाली. रामदास कदमांनी आपली खदखद व्यक्त केली तर गद्दारीची किंमत त्यांना मोजावी लागेल असा टोला वैभव नाईक यांनी रामदास कदमांना लगवाला आहे. दरम्यान, रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातील ठाकरे गटाचे आमदार विनायक राऊतांनी शिंदे आणि भाजपवर सडकून टीका केली. गद्दार आणि बेइमान गट एकमेकांच्या उरावर बसतील अशी टीका विनायक राऊतांनी केली. बघा कुणी काय केले आरोप-प्रत्यारोप?

Published on: Mar 03, 2024 11:32 AM