उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं वाटतं, राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?
नारायण राणे यांच्या प्रचारार्थ मनसेचे नेते रत्नागिरीत दाखल झाले होते. मात्र यावेळी राज ठाकरे हजर नव्हते. दरम्यान, या सभेत बोलताना नारायण राणे यांनी ७ तारखेला पार पडणाऱ्या लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी राज ठाकरे सिंधुदुर्गामध्ये येतील अशी अपेक्षा व्यक्त केली.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला. यानंतर मनसेचे नेते महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करताना दिसताय. रत्नागिरीमध्ये नारायण राणे यांना भाजपकडून लोकसभेची उमेदवारी देण्यात आली. नारायण राणे यांच्या प्रचारार्थ मनसेचे नेते रत्नागिरीत दाखल झाले होते. मात्र यावेळी राज ठाकरे हजर नव्हते. दरम्यान, या सभेत बोलताना नारायण राणे यांनी ७ तारखेला पार पडणाऱ्या लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी राज ठाकरे सिंधुदुर्गामध्ये येतील अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी नारायण राणेंनी राज ठाकरे यांचे आभार व्यक्त करत म्हटले की, मी लोकसभेचा उमेदवार जाहीर झालो आणि माझ्यासाठी सभा आयोजित केली. ते म्हणाले, योगायोग बघा इथं महायुतीची सभा आणि तिकडं उबाठाची जाहीर सभा. मी उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना…असंच म्हणेल कारण उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं वाटत…., असे म्हणत नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला.