नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल उदय सामंत म्हणाले...

नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल उदय सामंत म्हणाले…

| Updated on: May 07, 2024 | 4:02 PM

उदय सामंत यांचे सख्खे बंधू किरण सामंत हे सकाळपासून नॉटरिचेबल असल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. सकाळपासूनच किरण सामंत हे नॉटरिचेबल असल्याने त्यांचे कार्यकर्ते गोंधळात पडल्याचेही सांगितले जात आहे. यावर उदय सामंत यांनीच स्पष्टीकरण दिलंय

शिवसेनेचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांचे सख्खे बंधू किरण सामंत हे सकाळपासून नॉटरिचेबल असल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. सकाळपासूनच किरण सामंत हे नॉटरिचेबल असल्याने त्यांचे कार्यकर्ते गोंधळात पडल्याचेही सांगितले जात आहे. यावर उदय सामंत यांनीच स्पष्टीकरण दिलं आहे. किरण सामंत हे ग्रामीण भागात असल्याने फोन लागत नाही, असे स्पष्टीकरण उदय सामंत यांनी दिले आहे. किरण सामंत हे लांजामधील दुर्गम भागात असल्याने त्यांच्याशी संपर्क होत नसल्याने उदय सामंत यांनी म्हटले आहे. दरम्यान, यावर विरोधकांनीही प्रतिक्रिया दिली आहे. किरण सामंत गप्प बसले आहेत म्हणजे कार्यकर्त्यांनी काहीतरी इशारा समजावा, असं विनायक राऊत यांनी म्हटले आहे. तर किरण सामंत यांना संरक्षण द्या, पोलिसांना निवेदन दिलंय, असं वैभव नाईक यांनी म्हटलंय.

Published on: May 07, 2024 03:56 PM