नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले…
काल लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले. यामध्ये रत्नागिरी-सिंधुदुर्ग या मतदारसंघात देखील मतदान पार पडलं. मात्र याच दिवशी किरण सामंत हे नॉट रिचेबल असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचे पाहायला मिळाले.
मंत्री उदय सामंत आणि त्यांचे बंधू किरण सामंत हे शेवटपर्यंत माझा प्रचार करत होते, असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे. काल लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले. यामध्ये रत्नागिरी-सिंधुदुर्ग या मतदारसंघात देखील मतदान पार पडलं. मात्र याच दिवशी किरण सामंत हे नॉट रिचेबल असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, या चर्चांवर उदय सामंत यांनी स्वतः भाष्य करत सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम दिला. किरण सामंत हे ग्रामीण भागात असल्याने फोन लागत नाही, असे उदय सामंत यांनी म्हटले तर आज रत्नागिरी-सिंधुदुर्ग या मतदारसंघात भाजपकडून उमेदवारी देण्यात आलेल्या नारायण राणे यांना यासंदर्भात सवाल केला असता ते म्हणाले, किरण सामंत हे शेवटपर्यंत माझा प्रचार करत होते. उदय सामंत आणि किरण सामंत यांचे अतिशय चांगले सहकार्य मिळालं आहे.