‘मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर जाऊन बसलेला दुर्योधन’, मनसे नेत्याचा ठाकरेंवर निशाणा
उद्धव ठाकरे तुम्ही राजकारणी म्हणून नीच आहातच मात्र भाऊ म्हणून सुद्धा नीच आहात... प्रत्येक वर्षी ठाकरेंच्या जाहीरनाम्यात बेळगाव कर्नाटक सीमाप्रश्न सोडवण्याचा उल्लेख असायचा, मात्र यंदा नाही कारण काँग्रेसला दुखवायचं नाही, असे म्हणत संदीप देशपांडे यांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला. यानंतर महायुतीच्या प्रचारासाठी मनसे नेते मैदानात उतरले आहेत. रत्नागिरीत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केल्याचे पाहायला मिळाले. सतत ओरबाडून खाणाऱ्याला बिनशर्त पाठींबा याचा अर्थ कळणार नाही. मुख्यमंत्री बनावं म्हणून दुसऱ्याच्या मांडीवर जाऊन बसलेला दुर्योधन, असं म्हणत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केलाय. ते पुढे असेही म्हणाले की, उद्धव ठाकरे तुम्ही राजकारणी म्हणून नीच आहातच मात्र भाऊ म्हणून सुद्धा नीच आहात… प्रत्येक वर्षी ठाकरेंच्या जाहीरनाम्यात बेळगाव कर्नाटक सीमाप्रश्न सोडवण्याचा उल्लेख असायचा, मात्र यंदा नाही कारण काँग्रेसला दुखवायचं नाही, असे म्हणत संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरेंना खोचक टोला लगावला आहे. धारावीमध्ये उबाठाने मोर्चा केला नंतर अंबानीच्या मुलाच्या प्री विडींगमध्ये अदानींची भेट झाली… सेटलमेंट करायचं आणि दुसऱ्यांना प्रश्न विचारायचे असं म्हणत निक्रिय मुख्यमंत्री म्हणूनही संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरेंचा उल्लेख केला. बघा काय केला संदीप देशपांडे यांनी ठाकरेंवर हल्लाबोल?