रत्नागिरी-सिंधुदुर्गात आज मतदान अन् उदय सामंतांचे सख्खे बंधू नॉटरिचेबल; उमेदवारी न दिल्यानं किरण सामंत नाराज?

रत्नागिरी-सिंधुदुर्गात आज मतदान अन् उदय सामंतांचे सख्खे बंधू नॉटरिचेबल; उमेदवारी न दिल्यानं किरण सामंत नाराज?

| Updated on: May 07, 2024 | 12:32 PM

कोकणातून यंदाची लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी किरण सामंत हे इच्छुक होते. मात्र या चर्चेदरम्यान उदय सामंत आणि किरण सामंत यांनी संयुक्त पत्रकारपरिषद घेत या निवडणुकीत माघार घेत असल्याचे म्हणत किरण सामंत लोकसभा लढवण्याच्या चर्चांवर पूर्णविराम दिला होता. मात्र सकाळपासूनच किरण सामंत नॉटरिचेबल

शिवसेनेचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांचे सख्खे बंधू किरण सामंत हे नॉटरिचेबल असल्याची माहिती मिळतेय. आज सकाळपासूनच किरण सामंत हे नॉटरिचेबल असल्याने त्यांचे कार्यकर्ते गोंधळात पडले आहेत. कोकणातून यंदाची लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी किरण सामंत हे इच्छुक होते. मात्र या चर्चेदरम्यान उदय सामंत आणि किरण सामंत यांनी संयुक्त पत्रकारपरिषद घेत या निवडणुकीत माघार घेत असल्याचे म्हणत किरण सामंत लोकसभा लढवण्याच्या चर्चांवर पूर्णविराम दिला होता. त्यानंतर किरण सामंत यांनी भाजप उमेदवार नारायण राणेंचा प्रचार करणार असल्याचं म्हटलं होतं. मात्र सकाळपासूनच किरण सामंत नॉटरिचेबल असल्याने त्यांचे कार्यकर्तेदेखील संभ्रमावस्थेत आहेत. दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वीच किरण सामंत यांच्या कार्यालयावरील उदय सामंत यांचे फोटो आणि बॅनर त्यांच्या कार्यकर्त्यांनी हटवले होते. त्यामुळे त्यांची नाराजी स्पष्टपणे समोर आली होती. मात्र आत रत्नागिरी-सिंधुदुर्गात मतदार पार पडत असताना आज सकाळपासूनच किरण सामंत कोणाच्याही संपर्कात नसल्याची माहिती समोर येतेय.

Published on: May 07, 2024 12:26 PM