नारायण राणे यांचं एक ट्विट अन् कोकणातील राजकारणात नवा ट्विस्ट, नेमकं काय म्हणाले?
कोकणातील काही जागांवर शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात लोकसभेची तयारी सुरु केली असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र रत्नागिरी-सिंधुदुर्ग ही जागा भाजपची असून भाजपच या जागेवर निवडणूक लढणार? नारायण राणे काय म्हणाले?
मुंबई, २९ फेब्रुवारी २०२४ : आगामी लोकसभा निवडणुकीची सर्वच राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. लवकरच लोकसभा निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. अशातच लोकसभा निवडणुकीपूर्वी महायुती आणि मित्रपक्षांकडून रस्सीखेच होताना दिसतेय. अशातच कोकणातील काही जागांवर शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात लोकसभेची तयारी सुरु केली असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र रत्नागिरी-सिंधुदुर्ग ही जागा भाजपची असून भाजपच या जागेवर निवडणूक लढणार असल्याचा दावा केंद्रीय मंत्री नारायण राणेंकडून करण्यात आला आहे. ‘लोकसभेची निवडणूक लवकरच जाहीर होईल. विविध पक्षाचे बरेच नेते रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेसंबंधी आपला हक्क दाखवित आहेत. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेची जागा ही भारतीय जनता पक्षाची असुन भारतीय जनता पक्षच ही जागा लढवणार आहे.’, असं ट्वीट केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलं असून ते ट्वीट चांगलंच चर्चेत आलंय.