Barsu Refinery : बारसू प्रकल्प नक्की आहे तरी काय? ज्याला होतोय विरोध, काय आहे कारण?

Barsu Refinery : बारसू प्रकल्प नक्की आहे तरी काय? ज्याला होतोय विरोध, काय आहे कारण?

| Updated on: Apr 29, 2023 | 8:40 AM

VIDEO | रत्नागिरीतील बारसूमध्ये पोलीस आणि आंदोलकांमध्ये सर्वेक्षणाच्या ठिकाणी झटापट, का होतोय बारसूकरांचा या प्रकल्पाला विरोध?

रत्नागिरी : राज्यातील राजकीय वातावरण आता बारसू आंदोलनामुळे चिघळले आहे. काल सरकारकडून आंदोलन करणाऱ्या नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर आता विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर जोरदा हल्लाबोल केला जात आहे. रत्नागिरीतील बारसूमध्ये १३ हजार एकर जागेवर हा रिफायनरी प्रकल्प प्रस्तावित आहे. तेल शुद्धीकरण करणारा हा मोठा प्रकल्प आहे तर आशिया खंडातील सर्वात मोठा म्हणजेच तब्बल ३ लाख कोटींचा हा प्रकल्प आहे. हिंदुस्तान पेट्रोलियम, इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम या तीन सरकारी कंपन्यांची गुंतवणूक असणार आहे. या प्रकल्पातून १ लाख रोजगाराची निर्मिती होईल असे सरकारकडून सांगितले जात आहे. मात्र बारसूतील ग्रामस्थांसह स्थानिकांचा या प्रकल्पाला जागा देण्यास विरोध आहे. कारण या प्रकल्पामुळे पर्यावरणावर वाईट परिणाम होणार असं स्थानिकांचं म्हणणं असून त्यांनी तसा दावा केला आहे. इतकेच नाही तर पारंपारिक शेती, मत्स्य व्यवसाय, आंबा-काजूच्या बागा नष्ट होतील अशी भितीही स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे.