Hridaynath Mangeshkar यांना नोकरीवरुन काढण्यात आलं नव्हतं? PM Modi यांच्या वक्तव्यावर राऊतांना शंका

| Updated on: Feb 10, 2022 | 10:42 AM

आता त्याच मोदींना घेरण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनंतर शिवसेनाही (Shiv Sena) सरसावली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी दोन दिवस संसदेत जोरदार राजकीय बॅटींग करून विरोधकांना विशेषतः काँग्रेसला चित केले. काँग्रेस नसती तर…पर्यंत त्यांनी जोरदार टीका केली. यावेळी गृहमंत्री अमित शाह गालातल्या गालात हसत मोदींच्या भाषणाचा आस्वाद घेताना उभ्या देशाने पाहिले. आता त्याच मोदींना घेरण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनंतर शिवसेनाही (Shiv Sena) सरसावली आहे. सुप्रिया सुळेंनी मोदींना महाराष्ट्राचा अपमान करू नये, असे आवाहन केले. त्यानंतर आता शिवसेनेचा किल्ला सांभाळणारे संजय राऊत (Sanjay Raut) यांनी हृदयनाथ मंगेशकरांबाबत मोदी धडधडीत खोटं बोलत असल्याचे म्हणत रोखठोक प्रहार दिल्लीतच केलाय. इतकेच नाही तर मला जे काल बोलायचं होते ते मी बोललो. आता यापुढे जे बोलायचंय ते महाराष्ट्राच्या राजधानीत, मुंबईत बोलेन असा इशाराही दिलाय. त्यामुळे तो राज्यात येऊन काय फटाके फोडणार याची उत्सुकता लागली आहे.

Published on: Feb 10, 2022 10:41 AM