Amravati | शेतकऱ्यांच्या मदतीसाठी रवी राणा आक्रमक, अमरावतीत जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर कुजलेल्या सोयाबीनची होळी
बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीपूर्वी पावसानं खराब झालेल्या सोयाबीनची होळी केली. राणा यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनाबाहेर कुजलेल्या सोयाबीनची होळी करत राज्य सरकारचा निषेध केला.

कुजलेले सोयाबीन, संत्रे फेकले
बडनेराचे आमदार रवी राणा हे गेल्या सातत्यानं शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन करत आहेत. आज त्यांनी नियोजन भवनाबाहेर समर्थकांसह जोरदार घोषणाबाजी केलीय. शेतकऱ्यांना दिवाळी पूर्वी हेक्टरी 30 हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी त्यांनी केलीय. आज होणाऱ्या जिल्हा नियोजन बैठकीत शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्याचा ठराव मंजूर करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवण्याची मागणी रवी राणा यांनी केली.
Latest Videos