माझ्यावर खोटा गुन्हा दाखल, सोमवारी मुंबईत अधिवेशनाला जाणार, आमदार रवी राणा आक्रमक

माझ्यावर खोटा गुन्हा दाखल, सोमवारी मुंबईत अधिवेशनाला जाणार, आमदार रवी राणा आक्रमक

| Updated on: Mar 05, 2022 | 9:18 PM

आष्टेकर यांच्यावरील शाईफेक प्रकरणात रवी राणा यांनी जिल्हा सत्र न्यायालयाने दिलासा दिलाय. न्यायालयाने राणा यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला आहे. त्यानंतर माध्यमांशी बोलताना महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांविरोधात आक्रमक भूमिका घेणार असल्याचं रवी राणा यांनी स्पष्ट केलंय.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यावरुन निर्माण झालेला वाद आणि महापालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्यावरील शाईफेक प्रकरणामुळे आमदार रवी राणा वादात सापडले आहेत. आष्टेकर यांच्यावरील शाईफेक प्रकरणात रवी राणा यांनी जिल्हा सत्र न्यायालयाने दिलासा दिलाय. न्यायालयाने राणा यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला आहे. त्यानंतर माध्यमांशी बोलताना महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांविरोधात आक्रमक भूमिका घेणार असल्याचं रवी राणा यांनी स्पष्ट केलंय.

न्ययालयाने अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केल्यानंतर रवी राणा यांनी अमरावती पोलीस आयुक्तांवर गंभीर आरोप केलेत. पोलीस आयुक्तांनी दबावाखाली येऊन माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला, असा आरोप राणा यांनी केलाय. शाईफेकीच्या घटनेवेळी मी दिल्लीत होतो. असं असतानाही माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला. त्यामुळे मी आता अमरावती पोलीस आयुक्त आणि महापालिका आयुक्त यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी करणार असल्याचं रवी राणा यांनी सांगितलं. तसंच सोमवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनात सहभागी होणार असल्याचं राणा यावेळी म्हणाले.