Ravikant Tupkar : शेतकऱ्यांसाठी रविकांत तुपकर पुन्हा पुकरणार एल्गार, बुलढाणा जिल्ह्यात काढणार रथ यात्रा

Ravikant Tupkar : शेतकऱ्यांसाठी रविकांत तुपकर पुन्हा पुकरणार एल्गार, बुलढाणा जिल्ह्यात काढणार रथ यात्रा

| Updated on: Oct 23, 2023 | 10:21 PM

VIDEO | सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर रविकांत तुपकर आक्रमक. उत्पादक शेतकऱ्यांसाठी पुन्हा एल्गार पुकरणार. 1 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर दरम्यान बुलढाणा जिल्ह्यात तुपकर एल्गार रथ यात्रा काढणार आहेत. तर 20 नोव्हेंबरला एल्गार मोर्चा काढणार

बुलढाणा, २३ ऑक्टोबर २०२३ | सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी रविकांत तुपकर पुन्हा एल्गार पुकरणार आहेत. 1 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर दरम्यान बुलढाणा जिल्ह्यात रविकांत तुपकर एल्गार रथ यात्रा काढणार आहेत. तर 20 नोव्हेंबरला एल्गार मोर्चा काढणार आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर पुन्हा एकदा सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक झाले आहेत. सोयाबीनला 9 हजार तर कपाशीला 12 हजार रुपये प्रति क्विंटल दर द्यावा, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्ज माफी करावी, यासह अनेक मागण्या घेऊन रविकांत तुपकर पुन्हा एकदा मोठे आंदोलन उभे करणार आहे. विदर्भ मराठवाड्याचा दौरा करून रविकांत तुपकर बुलढाणा जिल्ह्यात एल्गार रथ यात्रा काढणार आहे आणि 20 नोव्हेंबर रोजी बुलढाणा जिल्ह्यात पुन्हा एकदा भव्य एल्गार मोर्चाची हाक तुपकर यांनी दिली आहे..

Published on: Oct 23, 2023 10:19 PM