शिंदे मुख्यमंत्री झाले अन् महाराष्ट्राला पनवती लागली, कुणी केली जिव्हारी लागणारी टीका?
'सोयाबीन कापसावर सभागृहात चर्चा होत नाही. त्यामुळे शेतकरी आक्रमक झाला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणत होते की, मी मुख्यमंत्री झालो तर या राज्यात शेतकरी आत्महत्या होऊ देणार नाही. मात्र दररोज शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे', मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर सडकून टीका
नागपूर, १९ डिसेंबर २०२३ : ‘महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. तर एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि महाराष्ट्राला पनवती लागली’ असे म्हणत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर सडकून टीका केली आहे. दरम्यान, सोयाबीन कापसावर सभागृहात चर्चा होत नाही. त्यामुळे शेतकरी आक्रमक झाला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणत होते की, मी मुख्यमंत्री झालो तर या राज्यात शेतकरी आत्महत्या होऊ देणार नाही. मात्र दररोज शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे. खरंतर तुम्ही मुख्यमंत्री झालात म्हणून महाराष्ट्राला पनवती लागली आहे, असे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी म्हटले आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. तर नागपूरच्या अधिवेशनामध्ये विदर्भ, मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांची चर्चा व्हायला पाहिजे परंतु तिथे काही चर्चा होत नाही. मुंबईच्या प्रश्नांची चर्चा नागपूरच्या अधिवेशनात करून काय करता इथे आमच्या प्रश्नांची चर्चा व्हायला पाहिजे आणि जर आमच्या प्रश्नांची चर्चा होत नसेल तर अधिवेशन अंडी उबवयाला घेता का? असा खोचक सवाल केलाय.