बळीराजा अडचणीत! १० कोटींची फसवणूक; शिवसेना आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना आमने-सामने

बळीराजा अडचणीत! १० कोटींची फसवणूक; शिवसेना आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना आमने-सामने

| Updated on: Apr 18, 2023 | 7:01 AM

VIDEO | राजकारण चांगलेच तापलं, शेतकऱ्यांचे १० कोटी बुडवले, शिवसेना आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेत काय होताय आरोप प्रत्यारोप?

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यात चिखली येथे हरदेव ट्रेडर्सच्या गाडे बंधूंनी शेतकऱ्यांचा कोट्यवधी रुपयांचा माल खरेदी करून पोबारा केला आहे. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मोठी फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. मात्र या प्रकरणात शिवसेना आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये चांगलेच राजकरण रंगताना पाहायला मिळत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या पत्नी शर्वरी तुपकर यांनी पोबारा केलेल्या व्यापाऱ्याच्या बाजूने नादार घोषित करण्यासाठी न्यायालयात वकीलपत्र दाखल केले यानंतर हे सर्व प्रकरण राजकीय आखाड्यात चर्चेला आल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, चिखलीत व्यापाऱ्याने शेतकऱ्यांचे 10 कोटी बुडवल्याच्या प्रकरणानंतर बुलढाणा जिल्ह्यात शिवसेना आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप होत असून आता तेथील राजकारण चांगलेच तापल्याचे दिसून येत आहे.

Published on: Apr 18, 2023 06:57 AM