राजू शेट्टी दौऱ्यावर असताना 'या' नेत्याच्या हालचाली वाढल्या; स्वाभिमानी शेतकरी संघटनेत फूट?

राजू शेट्टी दौऱ्यावर असताना ‘या’ नेत्याच्या हालचाली वाढल्या; स्वाभिमानी शेतकरी संघटनेत फूट?

| Updated on: Aug 03, 2023 | 9:48 AM

महाराष्ट्रात मागच्या काही दिवसांपासून राजकीय घडामोडींना मोठा वेग आला आहे. शिवसेना, राष्ट्रवादीनंतर आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेत फूट पडणार असल्याची चर्चा सुरु आहे.

बुलढाणा, 03 ऑगस्ट 2023 | महाराष्ट्रात मागच्या काही दिवसांपासून राजकीय घडामोडींना मोठा वेग आला आहे. शिवसेना, राष्ट्रवादीनंतर आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेत फूट पडणार असल्याची चर्चा सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून शेतकरी नेते रविकांत तुपकर आणि राजू शेट्टी यांच्यातील नाराजी दिसून येत आहे. बुलढाण्यात नुकताचं एक मोर्चा झाला. त्यावेळी त्या मोर्चाला राजू शेट्टी यांनी हजेरी लावली. राजू शेट्टी त्या मोर्चाला आल्याने रविकांत तुपकर यांनी त्या मोर्चाला जाणं टाळलं. त्यामुळे दोघांमध्ये बिनसल्याची चर्चा जोर धरु लागली आहे. विशेष म्हणजे तुपकर राजू शेट्टी यांना भेटायला सुद्धा आले नाहीत. तेव्हापासून शेतकरी संघटनेत फूट पडणार का ? अशी चर्चा जोर धरु लागली आहे.

 

 

Published on: Aug 03, 2023 09:48 AM