होऊ दे खर्च... प्रचारादरम्यान दोन विरोधकांनी तिसऱ्या विरोधकांच्या प्रभागात मारला मिसळीवर ताव

होऊ दे खर्च… प्रचारादरम्यान दोन विरोधकांनी तिसऱ्या विरोधकांच्या प्रभागात मारला मिसळीवर ताव

| Updated on: Apr 15, 2024 | 2:52 PM

आज पुण्यात काँग्रेसकडून लोकसभा लढणारे रवींद्र धंगेकर आणि मनसे सोडून वंचित आघाडीकडून लोकसभा लढणारे वसंत मोरे या दोघं विरोधकांनी तिसऱ्या विरोधकाच्या प्रभागात आज पुण्यात मिसळीवर ताव मारल्याचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. पुण्यातील राजकीय संस्कृती जपणारा व्हिडिओ वसंत मोरे यांच्याकडून पोस्ट करण्यात आला.

सध्या सगळीकडे लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची धामधूम सुरू आहे. विरोधक सत्ताधाऱ्यांच्या तर सत्ताधारी विरोधकांच्या मतदारसंघात आपला प्रचार करताना दिसताय. अशातच आज पुण्यात काँग्रेसकडून लोकसभा लढणारे रवींद्र धंगेकर आणि मनसे सोडून वंचित आघाडीकडून लोकसभा लढणारे वसंत मोरे या दोघं विरोधकांनी तिसऱ्या विरोधकाच्या प्रभागात आज पुण्यात मिसळीवर ताव मारल्याचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. पुणे शहरातील कसबा पेठ विधानसभेच्या पोटनिवडणूकीचे विजयी उमेदवार रवींद्र धंगेकर, मनसेला रामराम करत वंचितमध्ये सहभागी होऊन लोकसभा लढणारे आणि भाजपकडून माजी महापौर असणारे मुरलीधर मोहोळ हे लोकसभेच्या रिंगणात आहेत. त्यामुळे पुण्यात तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. अशातच पुण्यातील राजकीय संस्कृती जपणारा व्हिडिओ वसंत मोरे यांच्याकडून पोस्ट करण्यात आला. त्या व्हिडिओमध्ये वंचित आघाडीकडून मैदानात उतरलेले वसंत मोरे अन् काँग्रेसचे रवींद्र धंगेकर मिसळ खाताना दिसत आहेत. वसंत मोरे यांनी हा व्हिडीओ पोस्ट करताना सुसंस्कृत पुणे, आज रविभाऊ आणि मी, मुरलीआण्णा मोहळ यांच्या प्रभागात कोथरूड येथे सकाळी नाष्टा केला…असं कॅप्शन दिले आहे.

Published on: Apr 15, 2024 02:52 PM