ज्या घरात मुख्यमंत्र्यांनी पैसे वाटले ते घरं माझं, ‘मविआ’च्या उमेदवाराचा मोठा गौप्यस्फोट; बघा काय केलं वक्तव्य
VIDEO | गुन्हा दाखल करा... महाविकास आघाडीच्या कसब्यातील उमेदवाराने मुख्यमंत्र्यावर केला गंभीर आरोप, बघा व्हिडीओ
पुणे : पुण्यातील कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक नुकतीच काल झाली. या निवडणुकीच्या निकालाची प्रतिक्षा असतानाच महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपने कसब्यात पैसे वाटल्याचा आरोप केला, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कसब्यात पैसे वाटप केलं. ज्या घरात पैसे वाटले ते घर माझच होतं, असा आज मोठा गौप्यस्फोट रवींद्र धंगेकर यांनी केला आहे. रवींद्र धंगेकर यांच्या मोठ्या वक्तव्याने एकच खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यात पैसे वाटले आणि ज्या घरात पैसे वाटले ते घरं माझं होतं. पैसे वाटप केल्याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, प्रवीण दरेकर,चंद्रकांत पाटील यांच्यावरही निवडणूक आयोगानं गुन्हा दाखल करावा. माझ्यावरचं अन्याय का? हा पक्षपातीपणा कशासाठी?, असा सवाल रवींद्र धंगेकर यांनी केला आहे.
Published on: Feb 27, 2023 03:59 PM
Latest Videos