कसबा पॅटर्न आता राज्याला वेगळी दिशा देणारा ठरणार, ‘या’ काँग्रेस नेत्यानं व्यक्त केला विश्वास
VIDEO | 'या' काँग्रेस नेत्यानं सांगितलं कसबा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर विजयी होण्याचं कारण
पुणे : भाजपच्या बालेकिल्ल्यात रविंद्र धंगेकर यांना सुरुंग लावण्यात मोठं यश आलं आहे. कसबा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे रविंद्र धंगेकर विजयी झाल्यामुळे महाविकास आघाडीला आता बळ मिळाले आहे. ही निवडणूक जनसामन्य लोकांनी आपल्या हातात घेतली होती. त्यामुळे या ठिकाणी कोणत्याही पक्षाचं आणि पैशाचा कोणताही परिणाम झाला नाही असं स्पष्ट मत काँग्रेसचे आमदार आणि पोटनिवडणुकीचे काँग्रेसचे निरीक्षक संग्राम थोपटे यांनी सांगितले. तर यावेळी त्यांनी रविंद्र धंगेकर विजयी होण्याची कारणेही सांगितले. ते म्हणाले, ‘हा विजय एका काँग्रेस पक्षाचा नसून महाविकास आघाडीच्या सहकार्यामुळे झाला आहे.कसबा पोटनिवडणुकीत धंगेकर यांना सर्वसामान्यांचा आशीर्वाद मिळाला आहे. प्रचारयंत्रणेतही सामान्य माणूस सांगत होता की, यावेळी रविंद्र धंगेकरच. ही निवडणूक सर्वसामान्य माणसांची होती त्यामुळेच धंगेकर हे विजयी झाले आहेत. त्याचबरोबर हा कसबा पॅटर्न आता राज्याला वेगळी दिशा देणारा ठरणार आहे.’