Bank IMP News : बँकांची कामं पटापट करा, सप्टेंबर महिन्यात १५ दिवस बँका बंद, कारण...

Bank IMP News : बँकांची कामं पटापट करा, सप्टेंबर महिन्यात १५ दिवस बँका बंद, कारण…

| Updated on: Aug 29, 2024 | 12:24 PM

ऑगस्ट महिना संपण्यासाठी मोजके दिवस बाकी असून सप्टेंबर महिना अवघ्या काही दिवसांवर आला आहे. या महिन्याची प्रत्येक जण आतुरतेने वाट पाहत असतो. कारण या महिन्यात सगळ्यांचा लाडका बाप्पा घरोघरी विराजमान होत असतो. अशातच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने या काळातील बँकाच्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे.

येणाऱ्या सप्टेंबर महिन्यात मोठ्या सुट्ट्या अर्थात बँक हॉलिडे असून बँका १५ दिवस बंद असणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कोणत्या दिवशी सुट्टी असणार आहे, याची बँक हॉलिडे लिस्ट जाहीर केली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या हॉलिडे कॅलेंडर २०२४ नुसार, भारतातील विविध क्षेत्रांमधील खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँका सप्टेंबरमध्ये एकूण १५ दिवस बंद राहतील. सप्टेंबर महिन्याची सुरूवातच सुट्ट्यांनी होणार आहे, कारण रविवार १ सप्टेंबर रोजी रविवार असून साप्ताहिक सुट्टी असल्याने देशातील बँक शाखा बंद असणार आहे. त्यामुळे तुमची बँकाची काही कामं असतील तर ते पटापट उरकून घ्या..

1 सप्टेंबर- रविवारची सुट्टी
4 सप्टेंबर- श्रीमंत शंकरदेवाची तिरुभव तिथीची सुट्टी (गुवाहाटी)
7 सप्टेंबर- गणेश चतुर्थी (जवळपास भारतातील संपूर्ण बँकांना सुट्टी असणार)
8 सप्टेंबर- रविवारची सुट्टी
14 सप्टेंबर- दुसरा शनिवारची सुट्टी, पहिला ओणम (कोची, रांची आणि तिरुवनंतपुरम)
1 सप्टेंबर- रविवारची सूट्टी
16 सप्टेंबर- बारावाफट (जवळजवळ संपूर्ण भारतातील बँकांना सुट्टी असणार)
17 सप्टेंबर- मिलाद-उन-नबीची सुट्टी (गंगटोक आणि रायपूर)
18 सप्टेंबर- पंग-लाहबसोलची सुट्टी (गंगटोक)
20 सप्टेंबर- ईद-ए-मिलाद-उल-नबीची सुट्टी (जम्मू आणि श्रीनगर)
22 सप्टेंबर- रविवारची सुट्टी
21 सप्टेंबर- श्री नारायण गुरु समाधी दिवसची सुट्टी (कोची आणि तिरुवनंतपुरम)
23 सप्टेंबर- महाराजा हरिसिंह यांचा जन्मदिनची सुट्टी (जम्मू आणि श्रीनगर)
28 सप्टेंबर- चौथा शनिवारची सुट्टी
29 सप्टेंबर- रविवारची सुट्टी

Published on: Aug 29, 2024 12:24 PM