जीवनाची पुंजी बँकेत जमा केली अन्... ठेवीदार रडकुंडीला; भावना झाल्या अनावर

जीवनाची पुंजी बँकेत जमा केली अन्… ठेवीदार रडकुंडीला; भावना झाल्या अनावर

| Updated on: Dec 19, 2023 | 5:18 PM

नगर अर्बन बँकेत जवळपास 400 कोटी रुपयांचा घोटाळा झाला असल्याने रिझर्व बँकेने कारवाई केली आहे. तर 820 कोटी रुपयांचे कर्ज घेणे बाकी असून असून ठेवीदारांच्या 320 कोटी रुपये देणे बाकी आहे. या बँकेचे एकूण एक लाख पंधरा हजार सभासद आहेत.

अहमदनगर, १९ डिसेंबर २०२३ : अहमदनगर शहरातील 113 वर्ष जुनी असलेली नगर अर्बन मल्टीस्टेट बँकेची मान्यता रिझर्व बँकेने रद्द केल्याने ठेवीदारांच्या अडचणी वाढलेल्या आहे. अचानक झालेल्या या निर्णयामुळे अनेक ठेवीदारांचे ठेवी बँकेत अडकल्या असून ठेवीदार ठेवी मिळवण्यासाठी बँकेचे उंबरे झीजवत आहेत, मात्र ठेवी परत मिळत नसल्याने अनेक ठेवीदारांकडे आत्महत्या करण्याशिवाय कोणता पर्याय राहिला नसल्याचा ठेवीदारांनी सांगितलेय. तर नगर अर्बन बँकेत जवळपास 400 कोटी रुपयांचा घोटाळा झाला असल्याने रिझर्व बँकेने कारवाई केली आहे. तर 820 कोटी रुपयांचे कर्ज घेणे बाकी असून असून ठेवीदारांच्या 320 कोटी रुपये देणे बाकी आहे. या बँकेचे एकूण एक लाख पंधरा हजार सभासद आहे.

सर्वात जुनी बँक असल्यामुळे अनेक ठेवीदारांनी या बँकेत आपल्या जीवनाची पुंजी ठेवी म्हणून ठेवली होती. मात्र संचालकांनी केलेल्या घोटाळ्यामुळे बँक बंद पडली असून अनेक ठेवीदारांच्या ठेवी अडकून पडले आहेत त्यामुळे ठेविदार बँकेमध्ये अनेक चकार मारूनही ठेवी मिळत नसल्याने अहवाल दिल झाले आहेत आता आमच्यासमोर आत्महत्या शिवाय पर्याय नसल्याचाही सांगत असून अनेकांना ठेवी न मिळाल्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

Published on: Dec 19, 2023 05:18 PM