RBI: कर्जाचा हप्ता आणखी वाढणार; रेपो दारात आज पुन्हा वाढ होण्याची शक्यता

| Updated on: Aug 05, 2022 | 10:28 AM

सर्वसामान्यांच्या खिशावर आणखी भार पडणार आहे. कर्जाचा हप्ता महागल्याने चाकरमान्यांच्या बजेटवर परिणाम पडेल. महागाई नियंत्रणात आणण्यासाठी रेपो दारात वाढ करणे आवश्यक असल्याचे आरबीआयचे म्हणणे आहे.

आज रिझर्व्ह बँकेचे (RBI) पतधोरण जाहीर होणार आहे. सकाळी 10 वाजता आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास (Shaktikant Das) आज नवे पतधोरण जाहीर करणार आहेत. रिझर्व्ह बँकेकडून कर्जावरचे व्याजदर वाढण्याची शक्यता आहे. रेपो दरामध्ये 35 ते 50 बेसिस पॉईंट्सची वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर आणखी भार पडणार आहे. कर्जाचा हप्ता महागल्याने चाकरमान्यांच्या बजेटवर परिणाम पडेल. महागाई नियंत्रणात आणण्यासाठी रेपो दारात वाढ करणे आवश्यक असल्याचे आरबीआयचे म्हणणे आहे.

Published on: Aug 05, 2022 10:28 AM