मारकडवाडीत फेरमतदान होणार की घमासान रंगणार? EVM वर शंका अन् स्वखर्चानं मतदान

मारकडवाडीत फेरमतदान होणार की घमासान रंगणार? EVM वर शंका अन् स्वखर्चानं मतदान

| Updated on: Dec 03, 2024 | 10:52 AM

ईव्हीएम मशीनवर शंका म्हणून ज्या गावाने स्वखर्चाने मतपत्रिकेवर मतदान घेण्याचा निर्णय घेतला त्या गावात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. सोलापूरच्या माळशिरस तालुक्यातील मारकडवाडीच्या लोकांनी उचललेल्या पाऊलाविरोधात सरकारने कठोर निर्णय घेत त्याला विरोध केलाय.

सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडी हे गाव सध्या चर्चेचं केंद्र ठरतंय. ईव्हीएम मशीनवर शंका घेत गावातील उत्तम जानकर समर्थकांनी फेरमतदानाचा निर्णय़ घेतलाय. आज हे मतदान होणार आहे. मात्र एकदा निकाल लागून गेल्यानंतर पुन्हा मतदान घेतलं तर गुन्हे दाखल करण्याचा इशाराच प्रशासनाने दिलाय. गावात जमावबंदी देखील लागू झाली आहे. ईव्हीएम मशीनवर शंका म्हणून ज्या गावाने स्वखर्चाने मतपत्रिकेवर मतदान घेण्याचा निर्णय घेतला त्या गावात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. सोलापूरच्या माळशिरस तालुक्यातील मारकडवाडीच्या लोकांनी उचललेल्या पाऊलाविरोधात सरकारने कठोर निर्णय घेत त्याला विरोध केलाय. दाव्यानुसार मारकडवाडी या गावात शरद पवार गटाचे नेते उत्तम जानकर यांना माननारा मोठा वर्ग आहे. तरीसुद्धा भाजपला सर्वाधिक मतं मिळाल्याने गावकऱ्यांनी फेरमतदानाचा निर्णय घेतला. मात्र निवडणूक आयोगाशिवाय अशी प्रक्रिया कोणी राबवू शकत नाही, असे म्हणत नियमांचे उल्लंघन केल्यास ग्रामस्थांवर फौजदारी खटले भरण्याचा इशारा सरकारने दिलाय. मारकडवाडी गावात उत्तम जानकर यांना ८४३ मतं पडली आहेत. तर भाजपच्या राम सातपुते यांनी १ हजार ३ मतं पडली आहे. पाच महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला लीड होतं. मग आता महायुतीला लीड कसं गेलं? असा सवाल करत निवडणूक प्रक्रियेवर गावकऱ्यांनी आक्षेप घेतला आहे.

Published on: Dec 03, 2024 10:52 AM