पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलेल्या नाराजीची भाजपकडून दखल, चंद्रशेखर बावनकुळे स्पष्ट म्हणाले…
VIDEO | भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केलेल्या कालच्या 'त्या' वक्तव्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया, म्हणाले, '... अशा परिस्थितीत कारखान्यांना नोटीस' तर नाराजीनंतर चंद्रशेखर बावनकुळे पंकजा मुंडे यांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत.
मुंबई, १७ सप्टेंबर २०२३ | गेल्या काही दिवसांपूर्वी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला केंद्रीय जीएसटी आयुक्तालयाकडून नोटीस मिळाली. यानंतर पंकजा मुंडे यांनी या कारवाईवर जाहीरपणे नाराजी व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, पंकजा मुंडे यांनी माझ्या कारखान्याला नोटीस नाही तर थेट कारवाई करण्यात आल्याचे टीव्ही ९ मराठीच्या एका कार्यक्रमात म्हटले होते. यानंतर भारतीय जनता पक्षाकडून पंकजा मुंडे यांच्या नाराजीची दखल घेण्यात आली आहे. पंकजा मुंडे यांनी केलेल्या कालच्या त्या वक्तव्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सर्वच साखर कारखाने अडचणीत आलेत, अशा परिस्थितीत कारखान्यांना नोटीस आल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. दरम्यान, चंद्रकांत बावनकुळे पंकजा मुंडे यांना भेटून चर्चा करणार असल्याचेही सांगितले जात आहे.