मी लंगोट घालून तयार, मला भाजपला… वसंत मोरे यांनी लोकसभेसाठी थोपडले दंड
महाविकास आघाडीकडून यंदाच्या लोकसभेचं तिकीट वसंत मोरे यांना मिळणार? 'मला महाविकास आघाडीकडून संधी मिळेल अशी अपेक्षा आहे आणि पुणेकरांच्या भल्यासाठी माझा मविआ विचार करेल', अशी खात्रीही वसंत मोरे यांनी व्यक्त केली.
पुणे, १९ मार्च २०२४ : महाविकास आघाडीकडून यंदाच्या लोकसभेचं तिकीट वसंत मोरे यांना मिळणार का असा सवाल केला असता, माजी मनसे नेते वसंत मोरे यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली. ‘मला महाविकास आघाडीकडून संधी मिळेल अशी अपेक्षा आहे आणि पुणेकरांच्या भल्यासाठी माझा मविआ विचार करेल’, अशी खात्रीही वसंत मोरे यांनी व्यक्त केली. जो पक्ष पुण्यात विजयी होईल आणि भारतीय जनता पक्षाच्या विरोधात काम करेल, त्या पक्षासोबत वसंत मोरे कायम असतील. तर मविआतील तिनही पक्ष राष्ट्रीय स्तरावरील पक्ष आहे. मला जो निर्णय घ्यायचा आहे तो पुण्याच्या दृष्टीने घेईल. महाविकास आघाडीचा लोकसभेत विजय होईल, असा अंदाजही वसंत मोरे यांनी व्यक्त केला. मनसे-भाजप युतीवर बोलताना, वसंत मोरे म्हणाले, ‘अमित ठाकरे पुण्यातून निवडणुक लढवणार असतील तर मी तेव्हाच सांगितले होते की मी माघार घेतो. पण मी घेतलेला निर्णय योग्य कसा आहे हे ४ जूनला कळेल’, असे सूचर वक्तव्यही वसंत मोरे यांनी केले.