अभिषेक घोसाळकरांच्या हत्येचं कारण काय?; स्वत:वर गोळीबार करत गुंड मॉरिसची आत्महत्या

अभिषेक घोसाळकरांच्या हत्येचं कारण काय?; स्वत:वर गोळीबार करत गुंड मॉरिसची आत्महत्या

| Updated on: Feb 09, 2024 | 12:13 PM

मॉरिस नावाच्या एका व्यक्तीने अभिषेक घोसाळकर यांना एका कार्यक्रमात बोलावलं. दरम्यान, मॉरिसने घोसाळकर यांना आपल्या ऑफिसमध्ये बोलवून फेसबूक लाईव्ह देखील केलं. या लाईव्हनंतर मॉरिसने घोसाळकरांवर गोळ्या झाल्यानंतर स्वतःवरही गोळ्या झाडल्यात.

मुंबई, ९ फेब्रुवारी, २०२४ : ठाकरे गटाचे अभिषेक घोसाळकर यांची हत्या करण्यात आली आहे. पूर्व वैमनस्यातून अभिषेक घोसाळकरांची गुंड मॉरिसने हत्या केली आहे. दहिसरमध्ये ठाकरे गटाचे माजी नगरसेवर अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार करण्यात आलाय. मॉरिस नावाच्या एका व्यक्तीने अभिषेक घोसाळकर यांना एका कार्यक्रमात बोलावलं. दरम्यान, मॉरिसने घोसाळकर यांना आपल्या ऑफिसमध्ये बोलवून फेसबूक लाईव्ह देखील केलं. या लाईव्हनंतर मॉरिसने घोसाळकरांवर गोळ्या झाल्यानंतर स्वतःवरही गोळ्या झाडल्यात. यानंतर या घटनेमध्ये अभिषेक घोसाळकर आणि मॉरिसचाही मृत्यू झाला. वर्षभरापूर्वी अभिषेक घोसाळकर आणि मॉरिसमध्ये वाद झाला होता. गुंड मॉरिसला बलात्काराच्या गुन्ह्यातही अटक करण्यात आली होती. बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्यात घोसाळकरांचा हात असल्याच्या रागातून गुंड मॉरिसकडून गोळीबार करण्यात आला. बघा नेमकं काय आहे प्रकरण?

Published on: Feb 09, 2024 12:13 PM