विदर्भातील बहिरम यात्रेत भाविकांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी, बघा ड्रोननं टिपलेली भन्नाट दृश्य
विदर्भातील सर्वात मोठी यात्रा म्हणून ओळख असणारी बहिरम यात्रा चांगलीच रंगात आली असून दरवर्षी येथे हाजारो भाविकांची गर्दी उसळत आहे
विदर्भात प्रसिद्ध श्री क्षेत्र बहिरममध्ये यात्रा सुरू असून विदर्भातील अमरावतीच्या बहिरम यात्रेत भाविकांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी बघायला मिळत आहे. विदर्भातील सर्वात मोठ्या बहिरम यात्रेची मनमोहक दृश्य ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून टिपलेली आहेत. विदर्भातील सर्वात मोठी यात्रा म्हणून ओळख असणारी बहिरम यात्रा चांगलीच रंगात आली असून दरवर्षी येथे हाजारो भाविकांची गर्दी उसळत आहे.
गुलाबी थंडीत गरम हंडीवर ताव मारण्यासाठी येणाऱ्या खवय्यासह भाविकांच्या गर्दीने यात्रा परिसर भाविकांनी गजबजला आहे. ज्या ठिकाणी जागा मिळेल तिथे रोडगा पार्टीचा आनंद भाविक घेताना दिसताय. दोन वर्षांनंतर यंदा या सर्वात मोठ्या यात्रेचे चोख नियोजन करण्यात आले आहे. यासह पोलिसांचा चोख बंदोबस्त देखील करण्यात आला तर या यात्रेत दरवर्षी रिंगण सोहळा देखील आयोजित केला जातो.
Published on: Jan 24, 2023 08:38 AM
Latest Videos