Ayodhya Ram Mandir : दिग्गज मंडळींसह अयोध्या नगरीत मुकेश अंबानी त्यांच्या पत्नीसह दाखल
रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानीही अयोध्येत पोहोचले आहेत. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी नीता अंबानीही आहेत, दोघांच्याही चेहऱ्यावर राम मंदिर लोकार्पण सोहळ्यांचा आनंद दिसत आहे. तर उद्योगपती अनिल अंबानी अयोध्येत पोहोचले आहेत.
अयोध्या, २२ जानेवारी २०२४ : अयोध्येतील राम मंदिरातील रामाच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक अयोध्येत दाखल होत आहेत. देशातील जवळपास सर्वच मोठे उद्योगपती या कार्यक्रमाला हजेरी लावत आहेत. राम मंदिर ट्रस्टने मुकेश अंबानी-गौतम अदानीपासून रतन टाटा यांच्यापर्यंत सर्व उद्योगपतींना कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले होते. रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानीही अयोध्येत पोहोचले आहेत. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी नीता अंबानीही आहेत, दोघांच्याही चेहऱ्यावर राम मंदिर लोकार्पण सोहळ्यांचा आनंद दिसत आहे. तर उद्योगपती अनिल अंबानी अयोध्येत पोहोचले आहेत. अयोध्येत प्राण-प्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने अयोध्या नगरीला भव्य सजावट करण्यात आली आहे. एकीकडे रामलल्लाच्या सोहळ्याची देशभरात धूम दिसतेय तर दुसरीकडे या सोहळ्याच्या पूर्वसंध्येलाच मुकेश अंबानी यांचे घर असलेल्या अँटिलियावर जय श्री रामचा नारा झळकल्याचे पाहायला मिळाले. अँटिलियाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंनुसार, अयोध्येतील राम मंदिरात राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यापूर्वी अँटिलियाला सजवण्यात आल्याचे पाहायला मिळाले.