नितीन गडकरी यांचं ‘ते’ ट्वीट अन् घोडबंदर रस्त्यावरील प्रवाशांची वाहतूक कोंडींपासून सुटका
VIDEO | मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग हा गुजरात आणि मुंबईला जोडणारा एकमेव महामार्ग त्याच घोडबंदर रस्त्यावरील प्रवाशांची वाहतूक कोंडींपासून सुटका
पालघर : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग हा गुजरात आणि मुंबईला जोडणारा एकमेव महामार्ग आहे. परंतु मुंबईच्या बाहेर निघताना आणि गुजरातवरून मुंबईच्या प्रवेशावर घोडबंदर वर्सोवा येथील वाहतूक कोंडी ही रोजचीच बाब झाली होती, या वाहतूक कोंडील नागरिक त्रस्त झाले होते. मात्र आता त्याच घोडबंदर रस्त्यावरील प्रवाशांची वाहतूक कोंडींपासून सुटका झाल्याचे समोर आले आहे. घोडबंदरजवळील वर्सोवा पुलाचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जानेवारी 2018 मध्ये भूमिपूजन केले होते. मात्र त्यानंतर कोरोनाची जागतिक महामारी आली. त्यामुळे पुलाचे काम थांबले होते. मात्र कोरोना संपताच पुलाच्या कामाला गती मिळाली. दरम्यान, 27 मार्च रोजी कोणताही गाजावाजा न करता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एक ट्वीट केले. त्यानंतर अवघ्या 3 तासात रात्री 7 नंतर नवा वर्सोवा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. त्यामुळे वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला असून आता मुंबई, ठाणे, पालघर, गुजरात, सुरत या वाहनधारकांचा प्रवास सुखकर होणार आहे.