पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! शहराच्या पाणी कपातीसंदर्भात झाला मोठा निर्णय

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! शहराच्या पाणी कपातीसंदर्भात झाला मोठा निर्णय

| Updated on: Apr 26, 2023 | 3:05 PM

VIDEO | पुणे शहरावर पाणी कपातीचे संकट, कालवा समितीच्या बैठकीत झाला मोठा निर्णय; काय आहे पुणेकरांसाठी आनंदाची बातमी?

पुणे : पावसाळा सुरु होईपर्यंत पाणी कपातीचे संकट पुणेकरांवर असणार आहे. कारण पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या अनेक प्रकल्पाचा साठा घसरला असल्याने पुणेकरांना पाणीकपातीचं संकट होतं. मात्र अशातच पुणेकरांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडली. याबैठकीत पुणेकरांना दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला. पुणेकरांची पाणीकपात 15 मे पर्यंत टळली आहे. 15 मे नंतर आढावा घेऊन पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. कालवा समितीच्या बैठकीत पाणी नियोजनावर चर्चा झाली. त्यापूर्वी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ते म्हणाले, ‘पाणी सोडा म्हणून माझ्यावर दबाव असतो. पण पालकमंत्री म्हणून मला पाणी सोडता येत नाही. त्यासाठी चर्चा करून निर्णय घ्यावा लागतो. पिण्यासाठी, शेतीसाठी, उद्योगासाठी, पाणी लागते. पाण्याचे गणित दर चार महिन्यात बदलत, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.

Published on: Apr 26, 2023 03:03 PM