गडचिरोलीतील ‘या’ गावात १५ दिवसापासून वीज नाही; ‘किती दिवस अंधारात रहायचं?’ नागरिकांचा संतप्त सवाल?
VIDEO | गडचिरोलीतील 'या' गावात १५ दिवसापासून विद्युत वाहिनीचे तारा तुटलेल्या अवस्थेत, भोंगळ कारभारामुळे नागरिकांना मनस्ताप
गडचिरोली, ६ ऑगस्ट २०२३ | गडचिरोली जिल्ह्यातील कोरची मुख्यालयापासून ४० किलोमीटर अंतरावरील अतिदुर्गम कोटगुल गाव हे गेल्या १५ दिवसांपासून अंधारात असल्याचे समोर आले आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून या गावात काळाकुट्ट अंधार असल्याने पुन्हा किती दिवस अंधारात राहावे लागणार, असा संतप्त सवाल येथील नागरिक करत आहे. तर ही समस्या लवकर मिटवावी, अशी येथील नागरिकांनी विद्युत विभागाला मागणी केली आहे. एकतर वारंवार विद्युत खंडित होत असल्यामुळे येथील नागरिक आधीच त्रस्त आहेत तर दुसरीकडे पंधरा दिवसांपासून तुटलेल्या विद्युत तारा जोडून विद्युत सुरळीत करत नसल्याने विद्युत विभागाचा भोंगळ कारभारामुळे येथील नागरिकांना त्रास सहन करावे लागत आहे.
Published on: Aug 06, 2023 02:51 PM
Latest Videos