Special Report | किरण मानेंना मालिकेतून काढण्याचा वाद पेटला, गावकऱ्यांनी मालिकेचं चित्रीकरण बंद पाडलं
अभिनेते किरण माने यांना मालिकेतून काढण्यात आल्याचा वाद आता चांगलाच पेटला आहे. या मालिकेचे चित्रकरण सध्या वाईमध्ये सुरू आहे. किरण माने यांना मालिकेतून काढण्यात आल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत मालिकेचे चित्रिकरण बंद पाडले.
अभिनेते किरण माने यांना ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून काढण्यात आले होते. त्यांनी राजकीय भूमिका घेतल्यानेच त्यांना काढण्यात आल्याचा आरोप आता होत आहे. यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण रंगताना दिसत आहे. यावरून विरोधकांनी केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपावर जोरदार टीका केली आहे. ही मुस्काटदाबी खपून घेतली जाणार नाही, असा इशारा राष्ट्रवादीच्या वतीने देण्यात आला आहे. तर दुसरीकडे किरण माने यांना मालिकेतून काढल्याने सातारा जिल्ह्यातील वाईमध्ये ग्रामस्थ देखील आक्रमक झाले आहेत. त्यांनी या घटनेचा निषेध करत, मालिकेचे चित्रिकरण बंद पाडले.
Latest Videos