क्या बात है ! बीड-अहमदनगर मार्गाच्या रुंदीकरणात येणाऱ्या 100 वर्ष जुन्या झाडाचं रिप्लांटेशन
VIDEO | बीड-अहमदनगर महामार्गाच्या रस्ता रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आल्याने पुणे आणि पैठण प्रमाणेच आता बीडमध्येही शंभर वर्षांहून अधिक जुन्या झाडांचं रिप्लांटेशन करण्यात येणार आहे.
बीड, ११ ऑगस्ट २०२३ | सध्या राज्यभरात मोठ्या प्रमाणात विकासकामं सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. राज्याचा विकास करायचा म्हणून मोठाले बदल करण्यात येत आहे. काही ठिकाणी जुन्या इमारती जमीनदोस्त करण्यात येत आहेत तर काही ठिकाणी महामार्ग रस्त्याच्या मध्ये येणारे वर्षानुवर्षांच्या झाडांचा कोणताही विचार न करता कत्तल करण्यात येत आहे. मात्र बीडमध्ये वृक्ष प्रेमींच्या मागणीमुळे मोठा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे आणि पैठण प्रमाणेच आता बीडमध्येही शंभर वर्षांहून अधिक जुन्या झाडांचं रिप्लांटेशन करण्यात येणार आहे. सध्या बीड-अहमदनगर महामार्गाच्या रस्ता रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आलं आहे. बीड शहर ते नवगण राजुरी यादरम्यान शंभर वर्षांपूर्वीचे जुने झाडे आहेत. बीड शहर ते नवगण राजुरी यादरम्यान असणाऱ्या जुन्या झाडांचं जतन व्हावं, अशी आग्रही भूमिका वृक्ष प्रेमींनी केली होती. आता हीच बाब लक्षात घेऊन शंभर वर्ष जुन्या झाडांचे रिप्लांटेशन करण्यात येत आहे. प्रशासनाने वृक्ष प्रेमींच्या मागणीचा विचार करत शंभर वर्षांहून अधिक जुन्या झाडांचं रिप्लांटेशन करण्याचा निर्णय घेतल्याने वृक्ष प्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण आहे.