Ayodhya Ram Mandir : खान्देशना नाद नयी कराना… पांजरा नदीच्या पात्रात ६० फूट उंचीचं अयोध्येतील राम मंदिर साकारणार
धुळ्यातच श्रीरामाचं भव्य अयोध्येप्रमाणे मंदिर उभं करण्यात येत आहे. पांजरा नदीच्या पात्रात भव्य अशी हुभे हुबेहुब अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती उभारण्याचं काम आता प्रगतीपथावर आहे. भाजपाचे विधानसभा क्षेत्र प्रमुख अनुप अग्रवाल यांच्या संकल्पनेतून ही प्रतिकृती साकारणार
धुळे, १७ जानेवारी २०२४ : धुळ्यात श्रीरामाचं भव्य अयोध्येप्रमाणे राम मंदिर उभं करण्यात येत आहे. पांजरा नदीच्या पात्रात भव्य अशी हुबेहुब अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती उभारण्याचं काम आता प्रगतीपथावर आहे. भाजपाचे विधानसभा क्षेत्र प्रमुख अनुप अग्रवाल यांच्या संकल्पनेतून ही प्रतिकृती उभारण्यात येत आहे. या मंदिराची लांबी 110 फूट असून उंची 60 फूट आहे. तर रुंदी 70 फूट आहे. या आकाराचं हे मंदिर थर्माकोलद्वारे उभं करण्यात आलं असून या ठिकाणी श्रीरामलल्लाची मूर्ती ठेवण्यात येणार आहे. विशेष म्हणजे अयोध्येतील मंदिरात असणारी रामाची मूर्ती या ठिकाणी प्रतिकृती म्हणून ठेवण्यात येणार आहे. या ठिकाणी यात्रेसाठी विविध प्रकारचे पाळणे आणण्यात आले आहेत आणि दहा दिवस हा कार्यक्रम मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात येणार आहे. राम मंदिराची प्रतिकृती ही अयोध्येप्रमाणेच करण्यात आली असून स्थानिक कलाकारांच्या मदतीने अत्यंत कला कौशल्याने ही मंदिराची प्रतिकृती पांजरा नदी पात्रात तयार करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.