तुमचे नेते सुद्धा अजित पवारांबद्दल बोलण्याची हिंमत करत नाही, नरेश म्हस्के यांना कुणाचा इशारा

तुमचे नेते सुद्धा अजित पवारांबद्दल बोलण्याची हिंमत करत नाही, नरेश म्हस्के यांना कुणाचा इशारा

| Updated on: Apr 01, 2023 | 9:37 PM

VIDEO | स्वतःच्या लायकी पेक्षा जास्त बोलू नका, नरेश म्हस्के यांच्यावर कुणी केला जोरदार हल्लाबोल

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते नरेश म्हस्के यांच्यावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (सचिन खरात गट) अध्यक्ष सचिन खरात हे वारंवार टीका करताना दिसताय. त्यांनी आज पुन्हा एकदा नरेश म्हस्के यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘नरेश मस्के आज परत एकदा तुम्ही अजित पवार यांच्यावर खोटे आरोप केले असून तुम्ही ध्यानात ठेवा अजित पवार महाराष्ट्रातील सर्वच पक्षाच्या नेत्यांविषयी आदराने बोलतात कारण त्यांच्यावर सत्यशोधक विचाराचे संस्कार आहेत’, असे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (सचिन खरात गट) अध्यक्ष सचिन खरात यांनी म्हटले आहे. पुढे ते असेही म्हणाले की, राज्यात तुम्ही मध्यंतरी काय केलं त्यामुळेच तुम्हाला जनता गद्दार म्हणत आहे. तुमच्या नेत्याला ज्या शिवसेनेने नगरसेवक, आमदार, मंत्री बनवलं तरीसुद्धा तुमच्या नेत्याने या राज्यामध्ये काय केलं आणि कसं मुख्यमंत्रीपद मिळवलं त्यामुळे जनता गद्दार म्हणत असल्याचा टोला लगावला आहे. तर नरेश म्हस्के स्वतःच्या लायकी पेक्षा जास्त बोलू नका, तुमचे नेते सुद्धा अजित पवार यांच्याबद्दल बोलण्याची हिंमत करत नाही हे विसरू नका, असे आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाकडून करण्यात आले आहे.

Published on: Apr 01, 2023 09:37 PM