VIDEO : Dilip Walse-Patil Live | जबाबदार लोकप्रतिनिधींनी कायद्याच्या चौकटीत काम करावं : गृहमंत्री

VIDEO : Dilip Walse-Patil Live | जबाबदार लोकप्रतिनिधींनी कायद्याच्या चौकटीत काम करावं : गृहमंत्री

| Updated on: Apr 23, 2022 | 1:44 PM

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी मातोश्री बाहेर हनुमान चालिसा वाचण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे मातोश्रीबाहेर तणावाची स्थिती निर्माण झाली असून पोलिसांनी या ठिकाणी मोठा बंदोबस्त ठेवला आहे. गेल्या दोन तीन दिवसांपासून सुरू असलेल्या या राजकीय नाट्यावर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी जोरदार टीका केली आहे. दिलीप वळसे पाटील म्हणाले की, जबाबदार लोकप्रतिनिधींनी कायद्याच्या चौकटीत काम करावे.

गेल्या दोन दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर शिवसैनिकांचं आंदोलन सुरू आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी मातोश्री बाहेर हनुमान चालिसा वाचण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे मातोश्रीबाहेर तणावाची स्थिती निर्माण झाली असून पोलिसांनी या ठिकाणी मोठा बंदोबस्त ठेवला आहे. गेल्या दोन तीन दिवसांपासून सुरू असलेल्या या राजकीय नाट्यावर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी जोरदार टीका केली आहे. दिलीप वळसे पाटील म्हणाले की, जबाबदार लोकप्रतिनिधींनी कायद्याच्या चौकटीत काम करावे. राणा दाम्पत्यांना हनुमान चालिसाच म्हणायचा तर त्यांनी स्वत:च्या घरात म्हणावा. दुसऱ्यांच्या घरात जाण्याचं कारण काय? असा सवाल करतानाच कुणाची तरी सुपारी घेऊनच त्यांचा हा ड्रामा सुरू आहे. त्याशिवाय त्यांचं धाडसच होणार नाही. या मागचा कर्ताकरविता कोण आहे हे शोधलं जाईल, असा इशारा दिलीप वळसे पाटील यांनी दिला आहे.