Yavatmal | निवृत्त झालेल्या शिपाई श्रीमती सरस्वती ढोरेंचा सन्मान, उपअधीक्षकांनी केला विशेष सत्कार
यवतमाळमधील पुसद भूमी अभिलेख कार्यालयाच्या उपअधीक्षकांनी महिला शिपायाचा निरोप समारंभ अनोख्या पद्धतीने पार पाडला. साडी चोळी-बांगडी, सोन्याचे दागिने घडवून बळवंत मस्के यांनी निवृत्त झालेल्या शिपाई सरस्वती ढोरे यांचा सन्मान केला.
यवतमाळमधील पुसद भूमी अभिलेख कार्यालयाच्या उपअधीक्षकांनी महिला शिपायाचा निरोप समारंभ अनोख्या पद्धतीने पार पाडला. साडी चोळी-बांगडी, सोन्याचे दागिने घडवून बळवंत मस्के यांनी निवृत्त झालेल्या शिपाई सरस्वती ढोरे यांचा सन्मान केला. त्यानंतर स्वतः कार चालवत मस्केंनी ढोरे यांना घरी सोडले. कोणत्याही कार्यालयातला शिपाई म्हटलं, की त्याच्या प्रती केवळ काम करण्यापुरती सहानुभूती असते. परंतु आपले शासकीय कर्तव्य पार पाडत असताना शिपाई पदावरुन दाखवलेल्या तत्परतेमुळे अधिकाऱ्यांनाही जन सुविधा पुरवण्यासाठी सहकार्य होते, याचीच जाणीव पुसद भूमि अभिलेख कार्यालयाचे उपअधीक्षक बळवंत मस्के यांना दिसते. त्यामुळे निवृत्त झालेल्या शिपाई श्रीमती सरस्वती ढोरे (राहणार घाटोडी) यांचा यथोचित सत्कार त्यांनी केला. ढोरे मावशींचा साडी चोळी-बांगडी, सोन्याचे दागिने बनवून सन्मान केला. त्यानंतर उपअधीक्षक मस्केंनी ढोरे यांना चारचाकी गाडीत बसवत घाटोडी येथील त्यांच्या घरी स्वतः वाहन चालवून पोहोचवले.