‘जे आडवे येतील, आता त्यांना सरळ करणार’, राधाकृष्ण विखे पाटील स्पष्टच बोलले…
VIDEO | आमच्याच तहसीलदारांची आम्हाला लाज वाटते, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील नेमकं काय म्हणाले?
छत्रपती संभाजीनगर : महसूलमंत्री बाळासाहेब विखे पाटील यांच्या हस्ते वैजापूर तालुक्यातील झोलेगाव येथे मराठवाड्यातील पहिल्या शासकीय वाळू विक्री केंद्राचे उद्घघाटन करण्यात आले. यावेळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते घरकुल लाभार्थ्यांना वाळूचे मोफत पास देण्यात आले. यावेळी माध्यमांशी राधाकृष्ण विखे पाटील यांनी संवाद साधला. राज्यातील वाळू ठेकेदार आणि प्रशासनातील काही जण यासाठी अडथळे आणत आहे, परंतु धीर धरा…सगळे सरळ होईल. राज्य सरकारने नवीन वाळू धोरण आणले आहे. त्यानुसार ग्राहकांना 600 रुपये ब्रॉसने वाळू मिळणार आहे. त्यामुळे अवैध वाळू उपशाला लगाम लागेल, अशी अपेक्षा आहे. ऑनलाइन बुकिंगनंतर 15 दिवसांत वाळू घरपोच मिळण्याचे हे धोरण आहे. कोपरगावमध्ये तहसीलदार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडला. वाळूसाठी तो हफ्ता घेत होता. वाळूच्या बाबतीत आमचेच तहसीलदार हफ्ते घेतात, याची आम्हाला लाज वाटते आहे. सरकारी वाळू डेपोसाठी प्रशासनातील या लोकांनी ठेकेदारांशी संगनमत केले आहे. परंतु त्यांना आता सरळ केले जाईल, असेही त्यांनी म्हटले आहे.