अन् आई वडिलांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले
युक्रेनमधून युद्धजन्य परिस्थिती सुरु होण्याआधी सांगली जिल्ह्यातील ब्रह्मनाळ गावातील ऋषभनाथ मोलाज हा एमबीबीएसचे शिक्षण घेणारा विद्यार्थी मायदेशी परतला आहे.
युक्रेनमधून युद्धजन्य परिस्थिती सुरु होण्याआधी सांगली जिल्ह्यातील ब्रह्मनाळ गावातील ऋषभनाथ मोलाज हा एमबीबीएसचे शिक्षण घेणारा विद्यार्थी मायदेशी परतला आहे. या युद्धाला सुरुवात होण्याआधीच भारताच्या दूतावासाकडून जे काही विद्यार्थी भारतात पाठवण्यात आले त्यातील ऋषभनाथ मोलाज हा त्यापैकी एक. तेथील परिस्थितीचे वर्णन करताना त्याच्यापेक्षा त्याचे आई वडिल जास्त भावूक झाले. रशिया आणि युक्रेनचे आता सध्याची परिस्थिती भयानकतेचे बाहेर गेली आहे. त्यातच आज कर्नाटकातील एका विद्यार्थ्याचा बाँब हल्ल्यात मृत्यू झाल्याने भारतातील आई वडिल ज्यांची मुले युक्रेनमध्ये शिकायला आहेत ते चिंताग्रस्त झाले आहेत. त्यामुळे युद्धाची तीव्रता जास्त होण्याआधीच आपला ऋषभनाथ घरी आल्याने त्याच्या आई वडिलांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले.
Latest Videos