मुंबई-नाशिकला जोडणारा कसारा घाट बनतोय मृत्यूचा सापळा? चालकांकडून काय होतेय मागणी?

मुंबई-नाशिकला जोडणारा कसारा घाट बनतोय मृत्यूचा सापळा? चालकांकडून काय होतेय मागणी?

| Updated on: Jul 31, 2024 | 12:32 PM

मुंबई-नाशिक महामार्गाला जोडणाऱ्या कसारा घाटात ठिक-ठिकाणी रस्ते खचले असल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे वाहन चालकांला आपलं वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. कसारा घाट सध्या मृत्यूचा सापळा बनला असल्याचे म्हटलं जात आहे. बघा काय होतेय चालकांकडून मागणी?

मुंबई-नाशिक महामार्गाला जोडणारा कसारा घाट सध्या मृत्यूचा सापळा बनला असल्याचे म्हटलं जात आहे. कारण मुंबई-नाशिक महामार्गाला जोडणाऱ्या कसारा घाटात ठिक-ठिकाणी रस्ते खचले असल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे वाहन चालकांला आपलं वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. तसेच रस्ते खचले असताना वाहन चालवताना चालकाला अंदाज न आल्याने किंवा आपल्या वाहनावर नियंत्रण न राहिल्याने अपघातांचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कसारा घाट परिसरात अनेक ठिकाणी संरक्षक कथडे देखील तुटल्याचे दिसत आहे तर खड्डे बुजवण्यासाठी चक्क पेवर ब्लॉक वापरण्यात आल्याने कसारा घाटात अपघात आता नित्याची बाब झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः यामध्ये लक्ष घालून कसारा घाट दुरुस्तीचे आदेश द्यावेत अशी मागणी कसारा घाट या मार्गाववरून प्रवास करणाऱ्या चालकांकडून केली जात आहे.

Published on: Jul 31, 2024 12:32 PM